आडगांवच्या जवानाचा श्रीनगरजवळ हृदयविकाराने मृत्यू

आडगांवच्या जवानाचा श्रीनगरजवळ हृदयविकाराने मृत्यू

नाशिक । जम्म काश्मिर मध्ये श्रीनगरच्या पुढे सुमारे 70 कि. मी. अंतरावर तैनात असलेला आडगांव ता. जि. नाशिक येथील लष्करी जवान आप्पा मधुकर मते (36) यांचा ऑक्सिजन कमी पडल्याने मृत्यु झाला. या घटनेमुळे आडगांव येथे शोककळा पसरली असुन याचे पार्थिव उद्या नाशिकला येणार असल्याची माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.

श्रीनगरच्या पुढे सत्तर कि. मी. अंतरावर असलेल्या उंच भागातील एका चौकीवर कार्यरत असतांना ऑक्सीजन कमी पडल्याने आप्पा मते यांना हद्ययविकाराचा इटका आल्याने मंगळवारी (दि.7) राजी रात्री त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती आज सकाळी त्यांच्या आडगांव येथील कुटुंबिय व नातेवाईकांना देण्यात आली.

यानंतर या गावावर शोककळा पसरली असुन त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराचे मते यांच्या घरी धाव घेतली आहे. त्यांच्या मृत्युनंतर लष्कर व स्थानिक पोलीसांची कायदेशिर प्रक्रिया आज पुर्ण झाल्यानंतर रात्री किंवा उद्या त्यांचे पार्थिक नाशिकला आणले जाणार असल्याची माहिती लष्कराकडुन देण्यात आली आहे.

आप्पा मते हे अल्पभूधारक शेतकरीत असुन आई – वडील यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण केले होते. सन 2006 मध्ये ते सैन्यात भरती झाल्यानंतर मागील वर्षात त्यांचा बॉण्ड संपल्यानंतर त्यांनी पुढे चार वर्षाचा बॉण्ड वाढवून घेतला होता. मागील वर्षात सेवानिवृत्त न होता, त्यांनी देशप्रेमातून बॉण्ड वाढवून घेतल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

जम्म काश्मिर मध्ये अलिकडे काही दिवसात बदलेल्या वातावरणामुळे कायम दक्ष असलेल्या सैन्याच्या पथकात ते कार्यरत होते. शेवटी कर्तव्यावर असतांना त्यांचा हद्ययविकाराने मृत्यु झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई म्हाळसाबाई मते, पत्नी मनिषा (वय 30), अकरा वर्षाचा मुलगा प्रतिक, भाऊ भगिरथ असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com