Type to search

नाशिक

देवळा : वाजगाव येथे मद्याच्या भट्ट्यावर छापा; एकावर गुन्हा

Share

वाजगाव: देवळा पोलिसांनी अवैध दारु तयार कारणाऱ्यांविरुद्ध तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून तालुक्यातील वाजगाव येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला असून मद्य बनवण्याचे साहीत्य नष्ट करण्यात आले.

यावेळी १६०० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या हया कारवाईचे गावातील नागरीकांनी स्वागत केले आहे.
रविवार (दि. ५) रोजी मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनिल पवार , नितिन साळवे आदींनी वाजगाव येथील कोलते शिवार, व रामेश्वर धरण परीसरात गावठी मद्याच्या भट्टयांवऱ छापा मारून जमिनीत बुजून ठेवलेले प्लास्टीक ड्रम, व दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, साहीत्य आदी नष्ट केले.

यावेळी १६ लिटर दारू जप्त करण्यात येउन दादा धाकू सोनवणे याचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच बापू देवरे, माजी उपसरपंच अमोल देवरे, विनोद देवरे, ग्रामसेवक जे. व्हि. देवरे, व पोलीस पाटील सौ निशा देवरे आदी उपस्थित होते.

लॉक डाऊनमुळे तालुक्यातील सर्व मद्यविक्रिची दुकाने बंद आहेत. यामुळे गावठी मद्याला मागणी वाढली आहे. वाजगाव येथे काही ठिकाणी देशी व गावठी मद्याचीची विक्री केली जात असल्यामुळे शेजारील गावातील असंख्य मद्यपी त्या ठिकाणांवर गर्दी करू लागल्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग, ह्या गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता विचारात घेऊन वाजगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पोलिस पाटील यांनी आदीवासी वस्तीवर जाऊन ह्या विक्रेत्यांना दोनन दिवसांपूर्वी मद्य विक्री बंद करण्याची ताकीद दिली होती.

वाजगाव येथे १०० टक्के मद्यबंदी करण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. मद्याची भट्टी टाकण्यासाठी शेतात जागा उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना ताकीद दिली असून यापुढे अशा शेतकऱ्यांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– नीशा देवरे ( पोलिस पाटील,वाजगाव )

वाजगाव येथे ग्रामसभांमध्ये अनेक वेळा दारूबंदीचा ठराव केलेला आहे. गावातील तरूण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन झाली असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावातील महीलांच्या वतीने पोलिस कारवाईचे स्वागत करते.
– श्रीमती सुमनबाई देवरे (अध्यक्ष, दारूबंदी कमिटी वाजगाव )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!