Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसुरगाणा : मास्क न वापरणाऱ्या सात जणांविरुद्ध धडक कारवाई

सुरगाणा : मास्क न वापरणाऱ्या सात जणांविरुद्ध धडक कारवाई

सुरगाणा : दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असूनही नागरीक शासनाने सांगितलेले नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

विनाकारण घराबाहेर फिरणे, मास्कचा वापर न करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. नियम धाब्यावर बसवून वावरणार्‍या नागरीकांकडून एकूण ८००० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

- Advertisement -

शहरात मास्क न लावणार्‍या व फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणार्‍या अशा ७ जणांविरुद्ध नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली. त्यांच्याकडून ८०० हजारांचा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध कदम. सुनिल पवार, जगदिश पिठे, किशोर चव्हाण, मनोज पवार, विजय गोयल, गोविंद जाधव, अजिज शेख यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या