Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिर्डी महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार गंभीर

Share
शिर्डी महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार गंभीर Latest News Nashik Accident Shirdi Highway Injured

सिंन्नर : शिर्डी महामार्गावर केला कंपनीसमोर भरधाव फॉर्च्युनर आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

अधिक माहिती अशी कि शिर्डी बाजूकडून येणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर (MH ०४ HX ९९९०) कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. याअपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यावर कारचालक न थांबता सिन्नर शहराच्या दिशेने वेगात निघून गेला. मात्र अपघातग्रस्त दुचाकीच्या चाकात त्या जीपची नंबरप्लेट अडकून राहिली.

MH १७ HX ५३४० असा दुचाकीचा नं. असून दुचाकीस्वारांचे नाव अद्याप समजू शकले नाही. जखमी अवस्थेतील दुचाकीस्वारास इतर वाहनधारकांनी उपचारासाठी सिन्नर येथील खाजगी दवाखान्यात पाठवले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!