म.फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ४६४ लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग बाकी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक स्तरावरील एक लाख दहा हजार ४९४ पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ ४६४ लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग शिल्लक आहे.

या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ५४७ शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्हा बँक व्यतिरिक्त ७ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याला आधार नंबर लिंक नसून त्यांची नावे ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि चावडीवर जाहीर करण्यात आली आहेत. त्यांची तत्काळ आधार जोडणीस सुरुवातही करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये २ लाखाच्या कर्जमर्यादेत २३ हजार ५३ शेतकऱी आहेत. तर जिल्हा सहकारी बँकेत १ लाख १० हजार ४९४ शेतकऱ्यांची खाती आहेत. असे एकूण १ लाख ४५ हजार ५४७ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील ७ हजार ६७६ शेतकऱ्यांची आधार जोडणी होणे बाकी आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमधील ७ हजार २१२ शेतकऱ्यांच्या खात्यांचा समावेश अाहे. तर जिल्हा बँकेतील अवघी ४६४ शेतकऱ्यांचीच खाते आधारला लिंक करणे शिल्लक आहे. त्यामुळे ही प्रक्रीया त्वरीत करणे अत्यावश्यक असून त्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह बँकेची तालुका निहाय आधार जोडणी बाकी असलेले खाते –
मालेगाव -१७, चांदवड ५९, देवळा -३, सटाणा -५, कळवण-८६, दिंडोरी -४, पेठा -१२, इगतपुरी -५६, त्र्यंबक -४, सिन्नर -३१, नांदगाव-३०, निफाड -७१, येवला- ८६, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात एकही शेतकरी आधार लिंक होणे बाकी नाही.

बँक निहाय आधार जोडणी बाकी असलेले खाते –
बँक ऑफ महाराष्ट्र -३०५९, स्टेट बँक ऑफ इंडिया -९२९, युनियन बँक ऑफ इंडिया -३८३, सिंडीकेट बँक -१८६८, बँक ऑफ इंडिया- २४९, पंजाब नॅशनल बँक -६७३, सेंट्रल बँक ऑफ काॅमर्स -२०, एचडीएफसी बँक -२८, करुर -३

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *