नाशिकरोड : दारणा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

नाशिकरोड : दारणा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

नाशिकरोड : चेहेडी येथील दारणा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल संजय पाटील (रा. सामनगाव रोड) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान सामनगाव येथील काही युवक दुपारी चार वाजेच्या सुमारास दारणा नदीवर पोहण्यासाठी गेले असता यातील अमोल याचा मृत्यू झाला आहे. तेथील नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात देण्यात आला आहे.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com