Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : शिवडे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

सिन्नर : शिवडे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

शिवडे : गेल्या आठ दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. फूलाबाई वाघ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या अडकला.

आठवडाभरापूर्वी रामनाथ गोविंद वाघ यांच्या शेतातील शेडनेट फाडून बिबट्या आत शिरला होता. या वेळी ढोबळी मिरची तोडण्यासाठी घरातील सदस्यांसमवेत आलेली १२ वर्षांची मुलगी या घटनेत दैव बलवत्तर म्हणून वाचली होती. तर दुसऱ्या घटनेत भाऊसाहेब सुखदेव चव्हाण यांच्या वस्तीवर बिबट्याने वासरावर केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला होता. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. गेले दोन दिवस जागा बदलत या पिंजऱ्यात बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून शेळी सोडण्यात आली होती.

- Advertisement -

आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास फुलाबाई लक्ष्मण वाघ यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागास देण्यात आली. वनमजुर बाबुराव सदगीर, तसेच गणपत मेंगाळ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने या बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या