कोव्हीड रुग्णालयात ९५ करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार

कोव्हीड रुग्णालयात ९५ करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार

नाशिक : मविप्रच्या डाॅ.वसंतराव पवार कोव्हिड -१९ रुग्णालयात ९५ करोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच पाॅझिटिव्ह पोलिसांच्या १५ नातेवाईकांना या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ७५० च्या पुढे गेला आहे. एकटया मालेगावमध्ये रुग्णांची संख्या ६५० क्रास झाली आहे.

विशेषत: या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना करोनाची लागण झाली. तसेच येथे वैदयकिय सेवा देणार्‍या डाॅक्टर व परिचारिकांना देखील करोनाची बाधा झाली. करोना बाधित पोलिस व वैद्यकिय सेवेतील डाॅक्टरांना डाॅ.वसंतराव पवार कोव्हीड रुग्णालयामध्ये उपचारासाठि दाखल करण्यात आले आहे.

दोन दिवसांपुर्वी मालेगांव येथे बंदोबस्तात कोरोनाची लागण झालेल्या आणि उपचाराअंती कोरोनामुक्त झालेल्या एकूण ७ पोलीसांना आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले.

रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. सद्यस्थितीत कोव्हीड हाॅस्पिटलमध्ये ९५ करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तसेच करोना पाॅझिटिव्ह पोलिसांच्या २० नातेवाईक देखील या ठिकाणी उपचार घेत आहेत.

कोव्हिड हाॅस्पिटलमध्ये ९५ करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार सुरु आहेत. मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना करोनाची लागण झाली. यापुर्वी करोनामुक्त झालेल्या ७ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढिल एक दोन दिवसात ३० पोलिसांना डिस्चार्ज दिला जाईल.
– डाॅ. एन.एस.पाटिल, डाॅ.पवार कोव्हिड हाॅस्पिटल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com