जिल्ह्यात वादळी पावसाने ९३ घरांची पडझड ; कांदा, फळभाज्यांचे नूकसान

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : मान्सूनपुर्व वादळी पाऊस व गारपिटिने जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण या तालुक्यांना झोडपले असून सर्वाधिक नूकसान या ठिकाणि झाली आहे. त्यात ९३ घरांची पडझड झाली अाहे.

तर कांद्यासह भाजीपल्याचे मोठया प्रमाणावर नूकसान झाले आहे. तर सिन्नरला वीज पडून गाय दगावली. जिल्हा प्रशासनाकडून नूकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.

बुधवारी (दि.१४) झालेल्या वादळी पाऊस व गारपिटिने ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. कळवण तालुक्यात ३० घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक फटका दिंडोरी तालुक्याला सहन करावा लागला आहे. उमराळे मंडळात ९४ तर वणी मंडळात १३ मिमि इतका पाउस झाला.

कोचरगाव, सोनगाव व तिल्लोळि या गांवात ६७ घरांचे अंशत:पडझड झाली. तर देवपूर, देवठाण, झार्लिपाडा व गोळशी या गावातील ३७ शेतकर्‍यांचे कांदा, गहू , दोडका, बाजरी, काकडी, भोपळा ही पिके व फळभाज्या आडव्या झाल्या.

सुरगाण्यातील हतगड येथे ९ घरांची पडझड झाली. तसेच शेतातील कांदा आडवा झाला. दिंडोरी पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्याला गारपिटिचा तडाखा बसला. येथील ब्राम्हणवाडे, तळवाडे, कळमुस्ते, सापगावात १९ घरांचे पडझड होऊन नुकसान झाले.

तर सिन्नर तालुक्यातील गोंदे गावात वीज पडून गाव दगावली. जिल्हा प्रशासनाकडून नूकसानीचा पंचनामा करुन शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *