Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रगेल्या २४ तासात ८७ पोलीस करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत १७५८ पोलीस करोनाबाधित

गेल्या २४ तासात ८७ पोलीस करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत १७५८ पोलीस करोनाबाधित

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या ३१ मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी आता घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासह घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोनाबाधितांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. याच दरम्यान गेल्या २४ तासात ८७ पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलातील एकूण १७५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

पोलीस दलातील ५५ वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील कर्मचारी करोनाच्या परिस्थितीत काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनाशी यशस्वी लढा दिला आहे. तर काही जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. पोलीस दलातील कोविड १९ च्या कर्मचाऱ्यांचा आकडा दीड हजारांच्या पार गेला असून ६७३ जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच १८ जणांचे करोनामुळे निधन झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या