नाशिकमधील ६८ पैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह; नव्याने ३ संशयित रुग्ण दाखल

नाशिकमधील ६८ पैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह; नव्याने ३ संशयित रुग्ण दाखल

नाशिक : जिल्ह्यातील ५ कोरोना संशयितां पैकी ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यात नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील चौघंचा सामावेश आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये दाखल एका कोरोना संशयिताचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान जिल्हा सरकारी रुग्णालयात शनिवारी (दि.२८) तीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

आत्तापर्यंत ६८ पैकी ६४ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तर शनिवारी (दि.२८) दखल तिघांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षामध्ये गेल्या बुधवारी व गुरुवारी एकही कोरोना संशयित रुग्ण नव्याने दाखल झाला नव्हता. मात्र शुक्रवारी पाच आणि शनिवारी तीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात तीन कोरोना संशयित रुग्ण शनिवारी दाखल झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल असलेल्या चौघांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या चौघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना १४ दिवस होम-क्वारंटाईन केले आहे. आत्तापर्यंत ६८ जणांच्या स्वॅबचे अहवाल तपासणीत ६४जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत.

आत्तापर्यंत परदेशातून ५६८ नागरिक शहर-जिल्ह्यात दाखल झालेले असून, यापैकी ४१र नागरिक होम-क्वारंटाईन आहेत. त्यांची १४ दिवसांची दैनंदिन चाचणी सुरू आहे. तर, १५४ नागरिकांचे होम-क्वारंटाईनची चाचणी पूर्ण झालेली आहे. तर गेल्या २४ तासात परदेशातून १४ नागरिक शहर-जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात युएई व सौदी अरेबियातून प्रत्येकी एक-एक व अन्य देशातून १२ असे नागरिक आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com