फेसबुक ओळखीतून शिक्षकेला 52 लाखाचा गंडा

A cursor hovers over the words "Find Friends" on Facebook
A cursor hovers over the words "Find Friends" on Facebook

नाशिक। ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार शहर तसेच जिल्ह्यात वाढले असून भामटे अशिक्षीतांसह सुशिक्षीतांनाही लाखो रूपयांचा चुना लावत आहेत. अशाच प्रकारे फेसबुकवरुन ओळख करुन एका भामट्याने शहरातील शिक्षीकेस परदेशातून महागडी भेटवस्तु पाठवत असल्याची बतावणी करून तब्बल 51 लाख 95 हजार 489 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 43 वर्षीय शिक्षिकेच्या तक्रारीवरून सायबर पोलीसांनी सबंधीत व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2018 पासून संशयित

शिक्षिकेसोबत फेसबुकवरुन संपर्कात होता. ओळख वाढल्याने दोघांनीही व्हॉट्सअपवरुन संवाद साधण्यास सुरुवात केली. परदेशातून भेटण्यास येत आहे असे सांगून भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला. एक दिवस महागडी भेटवस्तू पाठवली असल्याचे सागीतले.

तर दोन दिवसात सबंधीत वस्तु विमानतळावर कस्टम विभागाने पकडली असल्याचे सांगत ती सोडवण्यासाठी काही पैसे भरण्यास सांगीतले. त्यावर विश्वास ठेवत महिलेने त्याने दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे भरले. याच पद्धतीने संशयिताने गेली दिडवर्षात वेगवेगळी कारणे देत महिलेकडून 51 लाख 95 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले मात्र कोणतीही भेटवस्तू दिली नाही किंवा दिलेल्या अश्वासनानुसार भेटण्यासही आला नाही.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सबंधीत महिला शिक्षीकेने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सबंधीत व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com