Saturday, May 11, 2024
Homeनाशिकदिंडोरी : लखमापूर येथील ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

दिंडोरी : लखमापूर येथील ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

लखमापूर : तालुक्यातील लखमापूर येथील ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दत्तात्रय शार्दुल असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखमापूर येथील दत्तात्रय रमेश शार्दुल उर्फ बंजा (३५) युवकाने त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. स्थानिक नागरिकांना निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती वणी पोलिस ठाण्यात कळवण्यात आली.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ भोये, कुणाल मराठे, प्रदीप शिंदे, अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या