यंदाही मुक्या जीवांवर संक्रात; २८ पक्षी जखमी तर दोघांचा मृत्यू

यंदाही मुक्या जीवांवर संक्रात; २८ पक्षी जखमी तर दोघांचा मृत्यू

नाशिक : यंदाही नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचे आदेश असतांनाही दिवसभरात २८ पक्षी जखमी झाले तर २ पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे यंदाही नायलॉन मांज्याने मुख्य जीवांचा जीव टांगणीला लावलायचे दिसून आले.

संक्रातीचा सण म्हणजेच पतंगोत्सव असं समीकरणच झालं आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी सर्रास विक्री होताना दिसून आली. यामुळे आज दिवसभरात एकूण २८ पक्षांना नायलॉन मांजाने जखमी केले तर एक कबुतर व एक वटवाघळास आपला जीव गमवावा लागला.

यामध्ये २८ जखमींमध्ये १९ कबुतर, २ कोकीळ, १ घार, ४ घुबड, १ साळुंखी, १ चिमणी अशा २८ पक्षांना नायलॉन मांज्यामुळे इजा झाली आहे. या जखमी पक्ष्यांवर अशोक स्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू.आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com