Friday, April 26, 2024
Homeनाशिकखरीप हंगामासाठी २१ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन

खरीप हंगामासाठी २१ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन

नाशिक : खरीप हंगामासाठी २१ हजार १३० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन जिल्हयासाठी प्राप्त झाले आहे.त्यापैकी २९ हजार ७१ मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला आहे.

रब्बी हंगामामधील १६ हजार ९९० मेट्रिक टन खते शिल्लक आहे.दि.२० मे अखेर एकूण ५४ हजार ४६१ मे. टन खत साठा उपलब्ध होणार आहे. बांधावर खते व बियाने वाटप मोहिमे अंतर्गत जिल्हयात ४२६ क्विंटल बियाने व ६५६ मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

आगामी खरीप हंगामासाठी विविध पिकान्तर्गत ९७ हजार ६८४ क्विंटल विविध पिकांच्या बियाणाची मागणी करण्यात आली आहे. हे बियाणे सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्याकडून उपलब्ध होणार आहे.यापैकी ४० हजार ७५५ क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची आवश्यकता नसल्याने ते स्वत:कडील बियाण्याची उगवन क्षमता तपासून बियाणे पेरणीसाठी वापरू शकतात.

याकरिता कृषि विभागामार्फत प्रचार व प्रसिध्दी सुरु आहे. जिल्हयासाठी बी.टी.कापूस बियाणांची १ लाख ३२ हजार १२६ पकिटांची मागणी करण्यात आली आहे. यापैकी ५६ हजार ९० पाकिटांचा पुरवठा झालेला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तेचे व रास्त दरात वेळेवर कृषि निविष्ठा मिळण्याकरिता जिल्हस्तरावर १ व तालुका स्तरावर १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत परवाना धारक कृषि निविष्ठा विक्रेत्यांकडूनच खते, बियाने व किटकनाशके पक्क्या बिलात खरेदी करावे, तसेच वाढीव दराने खते व बियाने यांची विक्री होता कामा नये याबाबत कृषी विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना खते व बियाने पुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या