Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमालेगाव येथे १३ लाखांचा तंबाखू साठा जप्त; एलसीबीची कारवाई

मालेगाव येथे १३ लाखांचा तंबाखू साठा जप्त; एलसीबीची कारवाई

मालेगाव : लॉकडाऊन असल्याने काळ्याबाजारात विक्रीसाठी विनापरवाना साठवलेला १३ लाख रुपये किमतीचा गायछाप तंबाखू पुडींचा साठा स्थानिक गुन्हे शाखा व केम पोलिसांच्या पथकाने आज छापा टाकून जप्त केला.

सोय गावातील सुपर मार्केटमध्ये आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात येऊन संबंधित दुकानदारास अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे १३ रुपयांची गायछाप २५ ते ४० रुपये किमतीत काळ्याबाजारात विकणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्याचा परवाना नसताना १३ लाख ४३२ रुपयांच्या गायछाप तंबाखूच्या २३३ गोण्या साठवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी हा साठा जप्त केला.

सोयगाव सुपर मार्केट मधील एस मोहनलाल अँड ब्रदर्स या दुकानात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांना मिळताच या दुकानावर छापा टाकण्यात आला.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दुकानदार संजय मोहनलाल छाजेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के के पाटील, दिगंबर पाटील संदीप दुनगुह यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या