Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरातून भाजीपाल्याची १०९ वाहने मुबईकडे रवाना; भावात सुधारणा

Share
बाजार समितीच्या शहरातील आवारात भाजीपाला विक्रीस मंत्री तनपुरे अनुकूल, Latest News Market Committee City Vegetables Sales Ahmednagar

नाशिक : जिल्ह्यातील भाजीपाल्याचे प्रमुख मार्केट असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागातून येणार्‍या भाजीपाला आवकेत लक्षणिय वाढ झाली आहे. आता मुंबई व उपनगरातील भाजीपाला मार्केट सुरळीत झाल्यानंतर आता शेतकर्‍यांंना भाजीपाल्यासाठी चांगला भाव मिळू लागला आहे. दरम्यान बुधवारी (६) मार्केट कमेटीतून मुंबईसह उपनगरात १०९ ट्रक भाजीपाला व कादा बटाटा रवाना झाला.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात भाजीपाला पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात मुंबईत भाजीपाल्यासाठी करण्यात आलेले अडथळे दूर झाल्यानंतर भाजी मार्केट चांगल्या प्रकारे सुरू झाले आहे.

शेतकर्‍यांनी आता लिलावाला प्राधान्य दिल्यानंतर व्यापारी देखील भाजीपाल्याच्या लिलावात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन भाजीपाला मुंबईला पाठवू लागले आहे. तसेच गेल्या दोन आठवड्यात नाशिक मार्केट कमेटीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला येऊ लागला असुन विक्रमी भाजीपाला मुंबईकडे जाऊ लागला आहे.

कडक उन्हाळा जाणवू लागल्याने भाजीपाल्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बुधवारी (दि.६) नाशिक मार्केट कमेटीत १४ हजार ६८९ क्विंटल भाजीपाला, कांदा, बटाटा व लसुन मुबईला रवाना झाला.

बुधवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत वांग्याला सरासरी सर्वाधिक असा प्रति किवंटल २२५० रु. (एकुण आवक ५०० क्विंटल) भाव मिळाला. कारले २५५० रु(एकुण आवक ५२८ क्विंटल), गिलके २०८५ रु.(एकुण आवक १३५ क्विंटल), ढोबळी मिरची १०६२ रु.(एकुण आवक ७०० क्विंटल), टमाटे ४५० रु.एकुण आवक ७२५ क्विंटल), फ्लॉवर १०७५ रु.(एकुण आवक ६०० क्विंटल), कोबी ६२५ रु.(एकुण आवक ८३० क्विंटल), भोपळा ५६५ रु.(एकुण आवक १५१५ क्विंटल), काकडी १००० रु.(एकुण आवक १२०० क्विंटल) असा भाव मिळाला. तसेच कांद्याला आज प्रति क्विंंटल ७० रु., बटाटा १७५० रु. आणि लसुन ७५०० रु. असा भाव मिळाला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!