Type to search

Breaking News maharashtra नंदुरबार नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

भाजपच्या ‘ही’ महिला खासदार लग्नाच्या बेडीत अडकणार

Share
भाजपच्या 'ही' महिला खासदार लग्नाच्या बेडीत अडकणार Latest News Nandurbar BJP MP Dr Heena Gavit will Get Marriage

नाशिक : नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या महिला खासदार डॉ. हिना गावित लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डॉ. तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. नुकताच हिना गावित यांचा मुंबईमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.

डॉ. तुषार वळवी हे एम डी डॉक्टर असून ते मुंबईमध्ये काम करतात. नंदूरबार जिल्ह्यातील हातधुई हे वळवी यांचं गाव आहे. डॉ. वळवी आणि हिना गावित यांच्या साखरपुड्याला काही मोजके नातेवाईक व मित्रमंडळींची उपस्थिती होती.

हिना गावित या माजी मंत्री विजय गावित यांच्या कन्या आहेत. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ. हिना गावित यांनी देखील एमबीबीएस. एमडी ची पदवी घेतली आहे.

हिना गावित यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा नंदुरबारमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!