Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नागवडे साखर कारखान्याच्या प्रारूप यादीवर हरकतींचा पाऊस; 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी

Share
नोकरीत आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालय, Latest News Job Reservations No Right High Court Order

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – नागवडे सहकारी साखर कारखान्याने 22 हजार 711 सभासदांपैकी केवळ नऊ हजार 589 सभासदांची यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांना पाठविली होती. 1197 मृत आणि 1054 थकबाकीदार असे 2251 वगळता 20 हजार 460 सभासद मतदारयादीत यावयास हवे होते. पैकी नऊ हजार 589 सभासद मतदारयादीत घेतले आणि 10 हजार 871 सभासद वगळले.

त्यामुळे नागवडे साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून आला. सभासद जागृती करण्याची मोहीम कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, जिजाबापू शिंदे, अ‍ॅड. बाळासाहेब काकडे व कैलास पाचपुते यांनी हाती घेऊन डावललेल्या सभासदांचा मेळावा घेतला .

पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आणि नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील साखर कारखान्यांनी सर्व सभासदांना प्रारूप यादीत घेतल्याने नागवडे कारखान्याच्या अडचणी वाढल्या होत्या. तशात भवानीनगर साखर कारखान्याचे 24 हजार 699 सभासद मतदार यादीत आल्याने, नागवडे कारखाना सभादांच्या डोळ्यावर आला. दरम्यान 23 जानेवारीच्या मेळाव्यात प्रा. तुकाराम दरेकर यांनी जाहीर केले की, नागवडे कारखान्याने न्यायालयात जाण्याची चुकीची भाषा करण्याऐवजी 26 जानेवारी 2020 रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या सभेत मृत आणि कारखाना उचल घेऊन थकबाकीत असणारे सोडून बाकीच्या 20 हजार 460 सभासदांना मतदारयादीत घेण्याचा ठराव कारावा.

एवढेच नाही तर अशा आशयाचा ठराव करण्याची विनंती प्रा. दरेकर यांनी कारखान्याच्या चेअरमनला पत्र देऊन केली होती. त्या प्रमाणे 26 जानेवारी 2020 च्या संचालक मंडळाच्या ठराव नंबर 9 ने तशा आशयाचा ठराव केल्याने अक्रियाशील ठरविलेल्या 11 हजार 925 सभासदांचा मार्ग सुकर झाला आहे.

27 जानेवारी 2020 पर्यंत हरकतीची मुदत होती. सुमारे 2 हजार हरकती आणि आक्षेप दाखल झाले. दरम्यान राजेंद्र नागवडे यांनी आपल्या सोसायटी मतदारसंघात 43 पैकी 10 सोसायट्या मतदारयादीत घेऊन 33 सोसायट्या डावलून आपला मतदारसंघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तीगत सभासदांच्या भाग भांडवल पूर्ततेला एक वर्षाची मुदतवाढ दिली, पांच वर्षे उस न घालणार्‍या पात्र ठरविण्याचा ठराव केला व वार्षिक सभेत अनुपस्थितीला क्षमापन दिले.

33 सोसायट्यांना वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचे क्षमापन न देता त्यांना वंचित ठेवले. त्या बाबत संचालक मंडळाच्या सभेत कोणताही ठराव केला नाही. त्यामुळे 33 सोसायट्यांची 33 गावे विरोधात जाऊ शकतात. सोसायट्या मतदार करण्यासाठी प्रसंगी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ असेही प्रा. दरेकर म्हणाले. हरकती दाखल करण्यासाठी केशव मगर, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, अ‍ॅड. बाळासाहेब काकडे, दीपक भोसले, कैलास पाचपुते, जिजाबापू शिंदे, अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे हे उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!