Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहाता नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा

राहाता नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा

उपनगराध्यक्ष पठारे यांची ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता नगरपालिकेला गेल्या 10 महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही. तातडीने सक्षम मुख्याधिकार्‍यांची नेमणूक कारावी, अशी मागणी राहात्याचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी शिवसेनेच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली .

- Advertisement -

गेल्या 10 महिन्यापासून राहाता पालिकेला मुख्याधिकारी नसून या पालिकेचा कारभार प्रभारी मुख्याधिकार्‍यांकडे असून ते राहाता पालिकेत फिरकतही नाही. त्यामुळे राहाता शहराची विकासकामे ठप्प झाली आहेत. राहाता पालिकेला तातडीने सक्षम व कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने राजेंद्र पठारे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. याची दखल घेत मंत्री शिंदे यांनी प्रधान सचिव नगरविकास 2 यांना याप्रश्नी तातडीने उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

राहाता पालिकेतील मुख्याधिकारी पदाची जागा गेल्या दहा महिन्यापासून रिक्त असून आतापर्यंत चार मुख्याधिकार्‍यांकडे प्रभारी कार्यभार दिला गेला. मात्र संबंधित अधिकारी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी राहूनच राहाता पालिकेचा कारभार पाहत आहेत.

त्यामुळे राहाता पालिकेचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांची कामे खोळंबली आहेत. विकासकामे ठप्प झाली असून नुकत्याच प्रशिक्षणार्थी मुख्याधिकार्‍यांनी या पालिकेच्या कारभाराची महिनाभरात झाडाझडती घेतली. त्यात अनेक गैरकारभार उघड झाल्याने चार कर्मचार्‍यांना निलंबित केले.

त्यात प्रमुख खातेप्रमुखांचा समावेश असल्याने त्या विभागाचा कारभार वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची कामे होत नाहीत, कर्मचार्‍यांवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याच्या सर्वच नगरसेवकांच्या तक्रारी असून तातडीने पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या