Wednesday, April 24, 2024
Homeनगरजामखेड : नगराध्यक्ष घायतडकसह तीन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड : नगराध्यक्ष घायतडकसह तीन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक व मित्र असे तीन जण चारचाकी वाहनातून फिरत असताना पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त करून साथ, रोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षावरच गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत जामखेड पोलिसात दीपक शहाजी बोराटे (वय 26 वर्षे, धंदा नोकरी, रा. पोलीस मुख्यालय अहमदनगर) यांनी फिर्याद दिली. गुरुवार दि. 7 रोजी सायंकाळी 8.15 वाजता जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल मुकुंद घायतडक हे आपल्या कारमधून (कार क्र. एम एच 12, के जे 3006) मित्र दादासाहेब पोपट कदम (वय 35), वाहन चालक राजू अकबर आतार (वय 34, तिघे राहणार आरोळे वस्ती जामखेड) हे तिघे लक्ष्मी चौक येथे आले असता चेक नाक्यावर विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच वाहनाचा कोवीड क्षेत्रात फिरण्यास परवाना नाही म्हणून करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांच्यावरच गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई, कोरोना बाबतची परिस्थिती बघुन घरी जात असताना पोलिसांनी अडवले त्यांना नगराध्यक्ष असल्याची माहिती दिली तरी पोलीस यांनी काही ऐकून न घेता गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात सरपंच हा कोरोना कमिटीचा अध्यक्ष आहे मग हा नियम नगराध्यक्षाला नाही का म्हणून लॉकडाऊन नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
-निखिल घायतडक, नगराध्यक्ष नगरपरिषद जामखेड

- Advertisment -

ताज्या बातम्या