Friday, April 26, 2024
Homeनगरनगर विद्यापीठ उपकेंद्राचा 15 दिवसांत अध्यादेश

नगर विद्यापीठ उपकेंद्राचा 15 दिवसांत अध्यादेश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांची माहिती

पुणे (प्रतिनिधी)– सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका महिन्याच्या आत 111 जागांसाठी जाहिरात निघेल. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व जागा भरण्यात येतील. वित्त आणि महसूल विभागाशी संबंधित 800 जागा भरायच्या आहेत. यासाठी देखील लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेईल. नाशिक आणि नगर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रांची मागणी आहे. येत्या 15 दिवसांमध्ये नाशिक, नगर उपकेंद्रांचा जीआर निघेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकला 2 महिन्यात उपकेंद्रांच्या जागेचं भूमिपूजन होईल, असे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

- Advertisement -

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी लवकरच 900 हून अधिक जागांची भरती करणार असल्याचं जाहीर केले. विद्येच्या माहेर घरातून कामकाजाला सुरुवात व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिल्याचंही यावेळी सामंत यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात 111 जागांसाठी जाहिरात निघेल. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व जागा भरण्यात येतील. तसेच 15 दिवसांमध्ये नाशिक, नगर उपकेंद्रांचा जीआर निघेल, असे स्पष्ट केले. यावेळी सामंत यांनी कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या एका तासात मान्य करण्यात आल्याची माहिती दिली.

गावागावात ग्रंथालय
मागील सरकारने 2012 पासून एकही ग्रंथालयाला मान्यता दिली नाही. ग्रंथालयांच्या मान्यतांना स्थगिती देण्यात आली होती. आता आम्ही लवकरच ही स्थगिती उठवणार आहोत, अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली. 5 हजारहून अधिक लोकसंख्या असणार्‍या प्रत्येक गावात ग्रामपंचायतची ग्रंथालयं सुरू केली जातील. तसेच तिथं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र चालवली जातील, असंही सामंत यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या