Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या रेल्वेस्थानावरील 28 गाड्यांना ब्रेक

Share
रेल्वेचा मोठा निर्णय : १४ एप्रिलपर्यंत रेल्वेसेवा राहणार बंद; मालगाडी, अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार, indian railway announced about rail service will closed till 14th April 2020

फक्त मालगाड्यांना परवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील लोकसह राज्यातील रेल्वेला 31 मार्चपर्यंत बे्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरच्या रेल्वे स्थानकांवरून मनमाड ते दौंड दरम्यान दररोज धावणार्‍या 28 रेल्वे गाड्यांना ब्रेक लागणार असल्याची रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

नगरच्या रेल्वे स्थानकावरून नगर ते कोपरगाव दरम्यान दैनदिन प्रवास करणार्‍यांंची संख्या मोठी आहे. साधारण पणे दररोज 800 ते एक हजार प्रवाशांना रेल्वेचा आधार आहे. कमी खर्चात रेल्वे प्रवास असल्याने अनेक नोकरदार नगरकर यांच्यासह अन्य प्रवासी रेल्वेचा आधार घेतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील लोकसह राज्यातील सर्व पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नगरच्या रेल्वे स्थानकावरील 28 रेल्वेला ब्रेक लागला आहे.

लालपरीही ठप्पच
कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रविवारी संचारबंदी पाळली. बाहेर पडणे तसेच गर्दी टाळून लोकांनी आपापल्या घरातच रहाणे पसंत केले. आता तर राज्यात 144 कलम लागू झाले असून यामुळे सर्वसामान्यांचे आधार असणारी लालपरी ठप्पच राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!