Friday, April 26, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यातून शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरेंना राज्यमंत्रिपद

नगर जिल्ह्यातून शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरेंना राज्यमंत्रिपद

आज मंत्रिमंडळ विस्तार; आज शपथ घेणार

मुंबई –  महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी पार पडणार आहे. अजित पवार या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नगर जिल्ह्यातून सेनेकडून आ. शंकरराव गडाख व राष्ट्रवादीकडून आमदार प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असून ते आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यास राहुरीला मंत्रिपदाचा पहिल्यांदाच मान मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र विकासआघाडीचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली.

आठ ते नऊ नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीचे 11, तर शिवसेनेचे 12 ते 13 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दहा जण शपथ घेणार आहेत. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.

यापूर्वी मंत्री राहिलेल्यांना आता मंत्री करू नका अशी मागणी तरूण आमदारांनी केली आहे. यावेळी तरूण चेहर्‍यांना संधी द्यावी अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. त्याआधी काल दुपारी साडेतीन वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या नावावर सोनिया गांधी शिक्कामोर्तब करणार आहेत. दरम्यान त्याआधी के. सी. वेणूगोपाल यांची थोरात यांनी भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

ठाकरे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची यादी

शिवसेना
मुंबई – अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत
कोकण – उदय सामंत, भास्कर जाधव, वैभव नाईक
पश्चिम महाराष्ट्र – संभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर
मराठवाडा – संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत
विदर्भ – आशिष जैसवाल, संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड
ठाणे – प्रताप सरनाईक
उत्तर महाराष्ट्र – गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे, शंकरराव गडाख

राष्ट्रवादी काँग्रेस
पश्चिम महाराष्ट्र – अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे
विदर्भ – अनिल देशमुख
ठाणे – जितेंद्र आव्हाड
मुंबई – नवाब मलिक
मराठवाडा – धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे
कोकण – आदिती तटकरे
उत्तर महाराष्ट्र – प्राजक्त तनपुरे

काँग्रेस –
उत्तर महाराष्ट्र – के. सी. पाडवी
मराठवाडा – अशोक चव्हाण, अमित देशमुख
पश्चिम महाराष्ट्र – सतेज पाटील, विश्वजीत कदम
विदर्भ – विजय वड्डेटीवार
मुंबई – वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल

- Advertisment -

ताज्या बातम्या