Friday, April 26, 2024
Homeनगरनगर- मुकुंदनगर, आलमगीर, सर्जेपुरात 145 नवे संशयित

नगर- मुकुंदनगर, आलमगीर, सर्जेपुरात 145 नवे संशयित

पुण्याच्या रिपोर्टची प्रतीक्षा । नगरकरांची धाकधूक कायम

अहमदनगर (प्रतिनिधी) – आतापर्यंत जिल्ह्यातील 760 व्यक्तींची कोरोने टेस्ट करण्यात आली असून त्यातील 24 पॉझिटिव्ह निघाले आहेत. याशिवाय श्रीरामपूर येथील तरुणही पॉझिटिव्ह निघाला असून तो पुण्यातील ससूनमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 25 झाली आहे. अलमगिर येथील पेशंटच्या संपर्कातील मुकुंदनगर, अलमगिर व सर्जेपुरातील 84 संशयितांचे काल तर आज पुन्हा 61 असे 145 स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात हे 145 नवे संशयित आढळून आले असून त्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती साागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंगळवारी आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची प्राावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत.

त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. सार्वजनिक संपर्क टाळावा. सर्व नागरिकांनी हे नियम पाळले, तर ही परिस्थिती बदलेल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा यंत्रणेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, कोरोनाची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे सध्या औषधी साठा आहे. जास्त संख्येने पीपीई कीट मिळण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले.

मेंबरही क्वारंटाईन
रविवारी अलमगिर येथील एक पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 31 जणांचे स्त्राव घेत ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील तीन पॉझिटिव्ह निघाले. त्यात अलमगिर येथील दोन आणि सर्जेपुरातील एकाचा समावेश आहे. सर्जेपुरात आढळलेला तरुण हा माजी लोकप्रतिनिधीशी (मेंबर) संबंधित आहे. त्यामुळे माजी लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कुटुंबियांतील सगळ्यांचेच स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवाराकेंद्रात दोन हजार नागरिक
कोरोनाचा प्रादुर्ााव वाढल्यामुळे राज्य सरकारने जिल्हा बंदी जाहीर केली. त्यामुळे बाहेरील स्थलांतरित, मजूर यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रशासनाने आणि खासगी आस्थापनांनी सुरु केलेल्या 29 निवारा केंद्रातून 2 हजार नागरिकांची व्यवस्था केली असून तेथे त्यांच्या निवास आणि ोजनाची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच. नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी होत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील बाधित – 25, नगर 11 परदेशी रुग्णासह, संगमनेर 04, नेवासा 02, जामखेड 06 परदेशी रुग्णासह, राहाता 01, श्रीरामपूर 01

- Advertisment -

ताज्या बातम्या