Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरवर हॉटस्पॉटचे संकट

नगरवर हॉटस्पॉटचे संकट

नवी दिल्ली- देशभरात 170 जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात मुंबई, उपनगरे, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश असल्याने डोकेदुखी वाढली आहे.

देशभरातल्या जिल्ह्यांचं वर्गीकरण हे तीन प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. हॉटस्पॉट असलेले जिल्हे, हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि ग्रीन झोन असलेले जिल्हे असे हे तीन प्रकार आहेत. देशात अजूनही समूह संसर्गाने करोनाचा संसर्ग झालेला नाही ही बाब महत्त्वाची आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

हॉटस्पॉट 11 जिल्हे
मुंबई, उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा.

कल्स्टरसह हॉटस्पॉट जिल्हे
15 हून कमी प्रकरणे असलले जिल्हे या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. यात कोल्हापूर, पालघर, अमरावतीचा समावेश आहे.

नॉन-हॉटस्पॉट जिल्हे
लातूर, सातारा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जळगाव, सिंधदुर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, धुळे, सोलापूर, अकोला, वाशिम, गोंदिया

- Advertisment -

ताज्या बातम्या