Wednesday, April 24, 2024
Homeनगरदिलासादायक : 45 व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक : 45 व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह

नेवाशाच्या रुग्णाची तिसरी टेस्ट निगेटिव्ह, आज कोरोनामुक्त झाल्याची घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 9 स्त्राव नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल होते. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास आणखी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील 45 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

दरम्यान, सर्वात दिलासादायक वृत्त म्हणजे जिल्ह्यातील दुसरा आणि नेवासा तालुक्यातील पहिला कोरोना बाधीताचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने ती व्यक्ती कोरोनामुक्त झाली असून आज (शनिवारी) तशी अधिकृत घोषणा होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने 479 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यातील 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 419 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात आता 36 ने वाढ झाली असून आता अवघ्या एका स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात 494 जणांची तपासणी करण्यात आली असून 110 जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण 380 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर 240 व्यक्तींनी त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्याची माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.

सध्या सतरा बाधित रुग्णांपैकी 16 रुग्णांना बूथ हॉस्पिटल येथे ठेवण्यात येत असून तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सर्वप्रथम बाधित आढळलेल्या रुग्णांची 14 आणि 15 व्या दिवशी करावयाची चाचणी निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. घरीच 14 दिवस त्या रुग्णाला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असून नियमितपणे देखरेख करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. याशिवाय, बाहेरुन आपल्या जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनाही होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही नागरिकांना या कोरोना आजाराची लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ. मुरंबीकर यांनी केले आहे.

आकडेवारीवरून गोंधळ
शुक्रवारी सायंकाळी आठच्या सुमारास काही इलेक्ट्रॉनिक माध्यमानी आणि राज्य सरकारच्यावतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रेसनोटमध्ये नगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा 20 दाखविण्यात आला. यामुळे एकीकडे राज्य सरकार नगरमधील कोरोना बाधीत हे 20 असल्याचे दर्शवित होते. तर शेवटपर्यंत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हे नगरमधील कोरोना बाधीतांचा आकडा हा 17 असल्याचे ठामपणे सांगत होते. अखेर रात्री दहाच्या सुमारास पुण्यावरून 36 व्यक्तींचा अहवाल आल्याची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचली. आधी सकाळी 9 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आणि रात्री उशीरा 36 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात

गुरूवारच्या बाधितांमध्ये एक नेवाशाचा शेवगाव त्यानंतर अमरापूर येथे प्रवास

गुरूवारी जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आला होता. यात नगर शहरात दोघे परदेशी तर दोन भाषांतकार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, यातील एक व्यक्ती हा नेवासा येथील असून त्यांने धार्मिक कार्यायासाठी नेवासा येथून शेवगाव आणि त्यानंतर अमरापूर येथे प्रवास केल्याचे शुक्रवारीसमोर येताच आरोग्य विभागाने नेवासा, शेवगाव आणि अमरापूर येथील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षणासोबतच त्या ठिकाणी बाधीताच्या संपर्कात आलेल्या नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

शेवगाव-नेवाशातील 8 हजारांहून अधिकांचे सर्वेक्षण
नेवासा आणि शेवगाव तालुक्यातील 8 हजार 252 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील बाधीत व्यक्ती हा शेवगाव आणि अमरापूर येथे प्रवास केलेला आहे. यामुळे नेवासा येथील 1 हजार 142, शेवगाव येथील 6 हजार 827, अमरापूर येथील 283 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून शेवगाव आणि अमरापूर येथील 18 व्यक्तींचे नमुने काल रात्री पुण्याला पाठविण्यात येणार होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या