Friday, April 26, 2024
Homeनगरनगर शहरातील तीन होम क्वॉरंटाईनवर गुन्हे दाखल

नगर शहरातील तीन होम क्वॉरंटाईनवर गुन्हे दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाय योजना करण्यात येत आहे. काही कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईन केले आहे. तसा शिक्का त्यांच्या हातावर मारण्यात आला आहे. अशा व्यक्तींना 14 दिवस घराबाहेर पडण्यास बंधन घातले आहे. असे असतानाही गुरुवारी तीन होम क्वॉरंटाईन नगर शहरात फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक रुग्णांची तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले अशा व्यक्तींच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून घरी सोडण्यात आले आहे. त्यांना पुढील 14 दिवस घर न सोडण्याचा आदेश आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून त्यांची दिवसातून दोन वेळेस तपासणी केली जात आहे. असे असतानाही गुरुवारी शहरामध्ये तीन होम क्वॉरंटाईन फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात भरती केले. यानंतर संबंधित व्यक्तींना घरी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, त्यांनी नियमांचा भंग केला म्हणून पोलिसांनी त्यांच्या विरोधात भादंवि कलम 269 व 188 नुसार गुन्हे नोंदविले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात व कोतवाली पोलीस ठाण्यात दोन व्यक्ती विरोधात हे गुन्हे नोंदविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या