Wednesday, April 24, 2024
Homeनगरदिल्लीची धग नगरात

दिल्लीची धग नगरात

फकिरवाड्यात उद्यापासून तीन दिवस ‘शाहीनबाग’

अहमदनगर (प्रतिनिधी) – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीच्या शाहीनबाग येथील आंदोलनाची धग आता नगरात पोहचली आहे. नगर शहरातील फकिरवाडा येथेही तीन दिवस नगरकर धरणे धरणार आहेत.

- Advertisement -

दिल्लीत 15 डिसेंबर दिवसांपासून महिलांचे शाहीनबाग येथे धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनला पाठींबा देण्यासाठी देशभरातील अनेक लोक भेटी देत आहेत. नगर शहरात संविधान बचाओ समितीच्यावतीने उद्यापासून (दि.16,17,18) सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत फकिरवाडा येथे शाहीनबाग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनादरम्यान डॉ. राम पुनियानी, माजी आ. डॉ. कुमार सप्तर्षी, विनोदी अभिनेते रहेमान खान हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यापासून (दि.15 डिसेंबर 2019) शाहीनबाग येथे शांततापूर्ण वातावरणात आंदोलन सुरु आहे. याकाळात पथनाट्य, नाटक, सभा आणि भाषणांच्या माध्यमातून महिला सीएए आणि एनआरसीचा विरोध करीत आहेत.

एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात सुरु झालेल्या दिल्ली येथील महिलांनी सुरु केलेले शाहिनबाग आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून देशभरात हजारो ठिकाणीही अशा प्रकारचे शाहिबाग आंदोलने आयोजित होत आहे. नगरमध्ये होणार्‍या आंदोलनात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या