Monday, April 29, 2024
Homeनगरनगर-बीड-परळीसाठी 449 कोटी 50 लाख

नगर-बीड-परळीसाठी 449 कोटी 50 लाख

दौंड-नगर-मनमाड दुहेरीकरणासाठी 58 कोटी

अहमदनगर – केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ‘पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास सुमारे 58 कोटी 75 लाख 48 हजार रुपयांची आणि अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अन्य वर्षांच्या तुलनेत यावर्षीची तरतूद अत्यंत कमी आहे. तर 1212 कोटी रुपये खर्चाच्या पुणे-संगमनेर-नाशिक नव्या मार्गासाठी तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हा मार्गही रखडणार आहे.

- Advertisement -

दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या 247 किलोमीटर लांबीच्या या दुहेरीकरणाच्या कामावर दोन हजार 350 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, 2021-22 या वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. या मार्गाचे विद्युतीकरण झाले असून दुहेरीकरण झाल्यास मनमाड-पुणे अंतर साडेतीन-चार तासांनी कमी होणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणार्‍या काही रेल्वेगाड्या या मार्गाने वळविता येतील. शिर्डी, शनिशिंगणापूर, पंढरपूर, तिरुपती ही तीर्थक्षेत्रे एकमेकांना रेल्वेने जोडणे शक्य होणार आहे. शिवाय नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणार्‍या रेल्वे वाहतूक मार्गातील दौंड-मनमाड रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. हा मार्ग एकेरी वाहतुकीचा असल्याने यावरील रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू असते. शिर्डी व शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी या मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक असल्याची मागणी होती.

शिवाय असे झाल्यास प्रवासी व मालवाहतुकीस त्याचा फायदा होईल, असे म्हणणे केंद्र सरकारकडे मांडले गेले होते. त्यामुळे 2015 मध्ये केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या सर्व्हेसाठी नऊ कोटी 37 लाख रुपयांची तरतूद केलेली होती. यातील विद्युतीकरणाचे काम आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. गत अर्थसंकल्पात 250 कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण यंदा तशी कमी झाली. त्यामुळे उद्दिष्टाप्रमाणे दुहेरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होणार आहेत.

नगर-परळी रेल्वेसाठी केंद्रासोबत राज्य सरकारने या कामाचा भार उचलला. पन्नास टक्के निधी राज्य सराकारने देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार दरवर्षी तरतूद केली जाऊ लागली. यावर्षीही 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आतापर्यंत राज्य सरकारने यासाठी 866 कोटी रुपये दिले आहेत.

अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाची गती कमी झाली आहे. नगर ते नारायणडोह या 15 किमी लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर 17 मार्च 2018 रोजी नगर ते नारायणडोह मार्गावर सात डब्यांची गाडी धावली.

त्यानंतर बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी पर्यंतचा पुढील 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वेला तब्बल एक वर्ष लागले. 25 फेब्रुवारी 2019 रोजी नगर, नारायणडोह, लोणी, पिंपळामार्गे सोलापूरवाडीपर्यंत चाचणीसाठी गाडी धावली. नगर-बीड-परळी मार्गावर अजून एकही रेल्वेस्थानकाची इमारत बांधून झालेली नाही. रूळ टाकून झालेल्या ठिकाणी फलाट मात्र टाकण्यात आले आहेत. या मार्गाचे काम रेंगाळत चालल्याने प्रस्तावित खर्चही 2200 कोटींवरून 3712 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेला पुन्हा ‘वेटिंग’कोपरगाव-रोटेगावलाही ठेंगा
पुण्याहून रेल्वेने नाशिकला जाण्यासाठी कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्यातून सध्याच्या रेल्वेसेवेला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. सर्वेक्षणानुसार नवा लोहमार्ग राजगुरुनगर, आळेफाटा, शिर्डीला येणार्‍या जाणार्‍या रेल्वे गाड्यांची संख्या अधिक असल्याने शिर्डी ते पुणतांबा दरम्यान नवीन ट्रक टाकण्यासाठी 72 लाख 74 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच श्रीगोंदा रोड येथे रेल्वेचे गेट स्वयंचलित बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख आणि अंडरग्राऊंड रस्त्यांसाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अधिक तरतूद हवी होती-वधवा
दरवर्षी नगर जिल्ह्यातील रेल्वे मार्गांसाठी तरतूद अधिक प्रमाणात केली जात होती. पण त्या तुलनेत यंदा कमी तरतूद झालेली आहे. मनमाड-नगर-दौंड दुहेरीकरणाच्या कामासाठी तसेच नगर-परळी रेल्वे मार्गासाठी अधिक तरतूद होण्याची गरज होती. यामुळे या मार्गाचे काम संथ गतीने होणार असून खर्च वाढण्याची शक्यता आहे. नाशिक-संगमनेर-पुणे या नव्या रेल्वे मार्गाचा गतवर्षी मोठा गाजावाजा झाला. यंदा या मार्गासाठी मोठी तरतुदीची अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. हा मार्ग झाल्यास पुणे-नाशिक प्रवास कमी वेळात होणार असून त्याचा नगर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. पण या मार्गासाठी दमडीही देण्यात आली नाही. रोटेगाव-पुणतांबा या मार्गासाठीही नेहमीप्रमाणे ठेंगा दाखविण्यात आला.
-हरजितसिंग वधवा
सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य व अध्यक्ष, जिल्हा प्रवासी संघटना

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेला पुन्हा ‘वेटिंग’
नारायणगाव, संगमनेर असा ठरविण्यात आला होता. त्यामुळे पुणे- नाशिक हे अंतर 260 किलोमीटरचे होणार आहे. त्यातून प्रवासाचा वेळही वाचणार असून, रेल्वेमार्गालगतच्या भागाच्या विकासालाही चालना मिळू शकणार आहे. पण या रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. कोपरगाव-रोटेगाव नव्या रेल्वे मार्गालाही यंदा ठेंगा दाखविण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या