Friday, April 26, 2024
Homeनगरनगर अर्बन बँकेला 40 लाखांचा दंड

नगर अर्बन बँकेला 40 लाखांचा दंड

उत्पन्न व कर्ज थकबाकीच्या नियमांचे उल्लंघन

अहमदनगर (प्रतिनिधी)– प्रशासक नियुक्त करून पहिला झटका दिलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुसरा झटका दिला आहे. बॅँकेचे उत्पन्न व कर्ज थकबाकीच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून अर्बन बँकेला 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

2018 पूर्वी बँकेच्या ऑडिटमध्ये ही त्रुटी आढळून आली होती. त्यात बँकेचे उत्पन्न व दिलेल्या कर्जाची थकबाकी याबाबत रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे समोर आले होते. त्यावर रिझर्व्ह बॅँकेने नगर अर्बनला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे सांगितले होते. बँकेने केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने बॅँकिंग अधिनियम 1949 चे कलम 56 अन्वये रिझर्व्ह बॅँकेने दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेचे चिफ जनरल मॅनेजर योगेश दयाल यांनी 27 मे रोजी दंडाचा हा आदेश काढला आहे.

बॅँकेच्या कारभारात अनियमितता असल्याने रिझर्व्ह बॅँकेने बॅँकेवर यापूर्वीच प्रशासक नियुक्त केला आहे. त्यापाठोपाठ बॅँकेला 40 लाखांचा दंड करून जोरदार झटका दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या