Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : वाडिया पार्कच्या वादग्रस्त इमारतीचा अखेर ‘खात्मा’

Share
नगर : वाडिया पार्कच्या वादग्रस्त इमारतीचा अखेर ‘खात्मा, Latest News Nagar Amc Wadiya Park Action Bulliding, Ahmednagar

महापालिका : दुसर्‍या इमारतीवर रविवारी फिरवला शेवटचा हात

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसर्‍या दिवशी (रविवारी) वाडियापार्क परिसरात अनधिकृत बांधण्यात आलेल्या (बी) व (ए) इमारतीवर मनपाने बुडलोझर फिरवत दोन्ही इमारती जमीनदोस्त केल्या.
1998 मध्ये तत्कालीन नगरपालिकेने वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी एका ठेकेदाराला दिली. मात्र, त्या ठेकेदाराने मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केले. क्रीडा संकुल समितीच्या पार्कींगच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याबाबत 2013 रोजी न्यायालयाने हे अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवार (दि.8) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने या गाळ्यांचे अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली. मात्र, त्या कारवाईला ठेकेदाराने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आक्षेप घेऊन अतिक्रमण कारवाई थांबविली. परंतु त्यानंतर सहा दिवसांनी शनिवार, रविवार (दि.15) रोजी सकाळी सलग दुसर्‍या दिवशी मनपाने दोन्ही इमारती जमीनदोस्त केल्या.

क्रीडा संकुलनात एफ इमारत, एम. आर. ट्रेड सेंटर (बी इमारत) पार्किंगच्या जागेत बांधले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे दीड वर्षापूर्वी महापालिकेचा प्रभारी आयुक्त पदभार होता. त्यावेळी द्विवेदी यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली होती. या भेटीत जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्त बांधकामाचा विषयही निघाला होता. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांंनी वेळोवेळी तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी व जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याशी चर्चाही केली होती. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून रविवारी (दि.15) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा क्रीडा संकुल समितीने ही जागा विकसीत करण्यासाठी 1 लाख फूट जागा जवाहर मुथ्था या ठेकेदाराला दिली होती. मात्र, त्या ठेकेदाराने पार्क साठी ठेवलेल्या जागेत अनधिकृत एफ इमारतीत 19 हजार 43 चौरस फूट, व बी इमारतीत 38 हजार 440 चौरस फूट अनधिकृत बांधकाम केले.त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे यांनी कारवाईचे नियोजन करून, तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी, 30 कर्मचारी, 4 होमगार्ड यांच्या बंदोबस्तात सलग दुसर्‍या दिवशी कारवाई केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!