Type to search

Featured नाशिक

केशकर्तन खुर्ची योजना कायमस्वरुपी राबवावी सिन्नर नाभिक समाज संघटनेची मागणी; जि. प. सीईओंना निवेदन

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाभिक समाजासाठी जिल्हा परिषदेकडून सेस अनुदानातून नव्यानेच तयार करण्यात आलेली केशकर्तन खुर्ची योजना अतिशय चांगली असून ही योजना कायमस्वरुपी राबवण्यात यावी. या योजनेचा लाभ मिळताना आमची कोणतीही तक्रार नसल्याचे समस्त नाभिक समाज संघटना सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा व लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या संकल्पनेतून नाभिक समाजबांधवांना आमच्या व्यवसायाला अनुसरून कधी नव्हे ती केशकर्तन खुर्ची योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आली. या योजनेमुळे शासकीय योजनेपासून दुर्लक्षित व वंचित असणार्‍या आमच्या नाभिक समाजबांधवांना चांगला व कायमस्वरुपी लाभ जि. प.च्या माध्यमातून मिळाला आहे. अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळाला असून आमची कोणतीही तक्रार नाही.

मात्र जि. प.च्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा झाली. या योजनेच्या खर्चाला आक्षेप घेऊन ठराव व पुढील खर्च मंजूर करू नये म्हणून जि. प. सदस्या सिमंतीनी कोकाटे यांनी आक्षेप घेतला. वस्तुस्थिती लक्षात न घेता मोघम आरोपही त्यांनी केले. हे अत्यंत खेदजनक आहे. मुळात आजपर्यंत आमच्या नाभिक समाजबांधवांना आमच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही शासकीय अनुदानित योजना नव्हती व पहिल्यांदाच राज्यात नाशिक जिल्ह्यात ही योजना प्रत्यक्षात मंजूर करून राबवण्यात आली. या योजनेचे जिल्ह्यातील समाजबांधवांबरोबरच राज्यातील आमच्या सर्व नाभिक समाज संघटनेने कौतुक व स्वागत केले आहे.

निवेदनावर अंबादास सोनवणे, सुकदेव शिंदे, राजेंद्र शिंदे, प्रकाश गायकवाड, रामेश्वर वाघ, विशाल सोनवणे, तुषार कदम, राजाभाऊ बिडवे, अविन बिडवे, चंद्रभान बिडवे, वसंत बिडवे, योगेश बिडवे, चंद्रकांत कदम, ऋषिकेश शिंदे, तुकाराम सोनवणे, प्रभाकर भराडे, अशोक भराडे, भूषण कडवे, ज्ञानेश्वर सोनवणे, अक्षय सोनवणे, दत्तात्रय पंडित, दत्तू जगताप, रामेश्वर भालेराव, भास्कर काळे, प्रदीप शिंदे, दिलीप न्हावी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोकाटेंचे आरोप चुकीचे
सदस्या सिमंतीनी कोकाटे यांनी केलेले आरोप चुकीचे असून अध्यक्ष शीतल सांगळे यांना बदनाम करण्याचे काम आहे. या बाबीचा आम्ही सर्व समाजबांधव निषेध करतो. या योजनेतील खुर्च्या आम्ही स्वत: लाभार्थ्यांनी खरेदी केल्या असल्याने या खुर्च्यांंचे पैसे आमच्या बँक खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!