Friday, April 26, 2024
Homeनगरयेणार्‍या काळात संतांच्या मार्गदर्शनाची गरज : ना. फडणवीस

येणार्‍या काळात संतांच्या मार्गदर्शनाची गरज : ना. फडणवीस

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संत संमेलनाचे आयोजन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोनाच्या काळात संत समाज अतिशय भक्कमपणे समाजाच्या पाठीशी उभा आहे. येणार्‍या काळात आत्मबळ हीच सर्वासाठी पुंजी राहणार असल्याने संत समाजाच्या अधिक मार्गदर्शनाची गरज असणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

महाराष्ट्र दिनी सर्व संत महंताशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संत संमेलनाचे आयोजन केले होते. यात 27 प्रमुख धर्माचार्य व साधुसंत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संयोजन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सह संयोजक आचार्य तुषार भोसले यांच्याकडे प्रदेश भाजपाने दिले होते.

या संत संमेलनात नगर जिल्ह्यातून सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांचाही सहभाग असवा असा आग्रह भाजपाचे नगर जिल्हा आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव मुठे यांनी केला होता. आणि मुठे यांच्या मागणीची प्रदेश आध्यात्मिक आघाडीने दखल घेऊन मंहत रामगिरी महाराज यांना नगर जिल्ह्यातून संधी मिळाली.

प्रारंभी पालघर मध्ये हत्या करण्यात आलेल्या दोन संतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संत समाज या लॉकडाऊन मध्ये आध्यात्मिक अंगांनी पाहतो, कमी साधनांमध्ये जगण्याचा सराव अशा अनेक विषयावर ना.फडणवीस व महंत रामगिरी महाराज यांची चर्चा झाली. तसेच जिल्हा व परिसरातील देखील माहिती ना. फडणवीस यांनी महाराजांकडून घेतली.

या संत संमेलन संवादात श्रीरामजन्म भूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, आचार्य तुषार भोसले, अ.भा.संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी, प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या पुज्य शिवानी दिदी, जैन धर्मगुरु श्री नयपद्यसागरजी, चैतन्य महाराज देगुलकर, संचखंड श्री हुजुर साहेब गुरुद्वारा, नांदेडचे संत श्री बलविंदरसिंग बाबाजी, सिंधी धर्मगुरु साई श्री राजेश कुमार, जैन साध्वी मधुस्मिता दिदी, वारकरी सांप्रदयाचे बंडातात्या कराड, शांतिगिरी महाराज, रामकृष्ण महाराज लहितकर, केशवदास महाराज, भक्तीप्रकाश दास, संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजी महाराज मोरे यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, आ. मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन आचार्य तुषार भोसले यांनी केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज हे देखील चर्चेत सहभागी होते.

जिल्ह्यातून रामगिरी महाराजांशी साधला संवाद !
संत संमेलनात नगर जिल्ह्यातून सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांच्याशी ना. फडणवीस यांनी व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे संवाद साधून विविध बाबींवर चर्चा केली. तसेच परिसरातील माहिती जाणून घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या