Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चरित्राच्या संशयावरुन विवाहितेचा खुन

Share

देवळा | प्रतिनिधी

तालुक्यातील कापशी फाटा परिसरात चरित्राच्या संशयावरुन विवाहितेचा खुन केल्याची घटणा घडली आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी. तालुक्यातील कापशी फाटा येथे राहणाऱ्या हिरामणृ महादू माळी याने पत्नीच्या लिलाबाई (वय 40) हिस चारित्र्याच्या संशयावरुन संशय घेत तीक्ष्ण हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारले तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती बेशुद्ध पडल्याचा बनाव करीत मयत लिलाबाईचे प्रेत आपल्या भावडे येथील घरी घेऊन गेला व जवळच्या नातेवाईकांना गुपचूपपणे बोलावून अंत्यसंस्कार करण्याची तयारी सूरु केली.

दरम्यान, याच वेळेस सदर घटणे बाबत देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक स्वप्निल रजपूत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली असता त्याची खातरजमा करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संजय मातोँडकर, गोपनिय विभागाचे निलेश सावकार व सहकाऱ्यांना पाठवले असता सदरचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय येताच येताच मयत सौ. लिलाबाईचा पती हिरामण माळी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले व विचारपूस करीत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व खरी हकीकत कथन करीत आपणच चारित्र्याच्या संशयावरु पत्नी लिलाबाईस जीवे मारल्याची कबूली दिली.

तोपर्यंत मयत लिलाबाईच्या माहेरच्या लोकांना सदर घटनेची माहिती मिळाल्याने वडिल बबन पवार रा. कोलटेक ता. चांदवड यांनी देवळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपी हिरामण महादू माळी यास अटक करण्या आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक स्वप्निल राजपूत व सहकारी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!