Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट महिला वापरणार; ट्विटवरून घोषणा

Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट महिला वापरणार; ट्विटवरून घोषणा Latest News Mumbai Women will use Prime Minister Narendra Modi's Social Media

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याच्या चर्चांवर स्वतः मोदींनी मोठा खुलासा केला आहे. नुकतेच एका ट्विटमधून त्यांनी हा खुलासा केला आहे. येत्या महिलादिनी मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट महिला वापरणार अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कालच एका ट्विट द्वारे माहिती दिली होती कि येत्या रविवरोपासून सोशल मीडिया सोडणार आहे. यानंतर सोशल मीडियावर मोदी यांच्या ट्विट वरून चर्चाना उधाण आले होते. परंतु यावर आता पडदा पडला आहे. याचा खुलसाही त्यांनी ट्विट करून केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि महिला दिनाच्या दिवशी मोदींचे ऑफिशियल अकाउंट काही निवडक महिलांना वापरायला मिळणार आहे. यावरून या महिला आपल्या प्रेरणादायी विचार या माध्यमातून शेअर करू शकणार आहेत. अशा महिलांना या ट्विटद्वारे नमूद करू शकता असे आवाहन हि त्यांनी या ट्विट मधून केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!