Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज्यात करोनाचे १५७६ नवे रुग्ण; करोना बाधितांचा आकडा २९ हजार १०० वर

Share
नांदगाव : करोना बाधित महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह; Nandgaon: Reports of three in contact with a woman affected by corona are positive 

मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!