कोरोना व्हायरस : वुहानमध्ये एकाच दिवसांत १५ जणांचा मृत्यू..! भारतातही अलर्ट

कोरोना व्हायरस : वुहानमध्ये एकाच दिवसांत १५ जणांचा मृत्यू..! भारतातही अलर्ट

नवी दिल्ली : चीन मधील वुहान शहरातील कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून एका दिवसात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केरळासह मुंबईलाही अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यापासून कोरोना व्हायरस चीनसह अन्य देशांत सुद्धा झपाट्याने पसरत चालला आहे. त्यामुळे चीनसह, अमेरिका व परिसरातील इतर देशांनाही अलर्ट करण्यात आला आहे. आता पर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहचला आहे.

या व्हायरसचे परिणाम भारतात सुद्धा दिसून येत असून केरळ सह मुंबईवरही कोरोनाचे सावट आहे. दरम्यान चीन मधून केरळमध्ये आलेल्या सात जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात लागण झाल्याची लक्षणे दिसून आली नाही. मात्र आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्यास सांगितले असून राज्यात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे
प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर २०१९ महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com