स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षांच्या नवीन तारखा ३ मे नंतर ठरणार

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षांच्या नवीन तारखा ३ मे नंतर ठरणार

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय घेण्यात आला होता की, सगळ्या परीक्षांच्या तारखांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, ज्यात उमेदवारांना देशाच्या विविध भागांमधून प्रवास करून यावे लागते.

संयुक्त उच्च माध्यमिक (10 + 2) परीक्षा (श्रेणी – 1), कनिष्ठ अभियंता (पेपर – 1) परीक्षा 2019, स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी` आणि `डी` परीक्षा 2019 आणि संयुक्त उच्च माध्यमिक श्रेणी परीक्षेसाठी कौशल्य चाचणी परीक्षा 2018 या परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय 3 मे, 2020 नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाईल.

या परीक्षांच्या तारखांचे केलेले नियोजन आयोगाच्या वेबसाइटवर आणि आयोगाच्या प्रादेशिक / उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिसूचित केले जाईल. आयोगाने अधिसूचित केलेल्या परीक्षांच्या वार्षिक वेळापत्रकाच्या बरोबरच अन्य परीक्षांच्या वेळापत्रासंदर्भातही आढावा घेतला जाईल.

तसेच, एसएससीचे (स्टाफ सिलेक्शन कमीशन) सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदस्य त्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन परिस्थितीतील पंतप्रधान नागरिक सहायता आणि मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देतील, असे ठरविण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com