Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकरोनाच्या जनजागृतीची मराठी सिनेकलाकारांचा सहभाग असणारे गाणे प्रदर्शित

करोनाच्या जनजागृतीची मराठी सिनेकलाकारांचा सहभाग असणारे गाणे प्रदर्शित

मुंबई : कोव्हीड १९ या विषाणूच्या जनजागृतीसाठी मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांना २१ कलाकारांनी आणि २१ देशातील लोकांनी या प्रेरणादायी गाण्यात सहभाग घेतला आहे .

‘डॉकटर करतो ड्यूटी, ड्यूटी आपल्यासाठी पोलीस करतो ड्यूटी, ड्यूटी आपल्यासाठी शासन करतो, ड्यूटी आपल्यासाठी
घे जबाबदारी, तू रहना घरी बस घर मे रे रेहाना ईतनाही करना’
असे या गाण्याचे बोल आहेत.

- Advertisement -

यातूनच करोना विषयी जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे. अंकुश चौधरी, पिया बापट, मृण्मयी देशपांडे, अभिजित कोसंबी, कुशल बद्रिके, सचिन पिळगावकर यांच्यसह अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. युकेहून प्रणोती जाधव, अनिल कापरेकर अमेरिकेहून देविका जोशी, चंद्रकांत आहिरे, युएईहून निलेश देशपांडे सिंगापूरहून निकिता सुळे न्यूझीलंडमधून अनय जोशी जपानमधून मानसी देवधर यासह अनेकांनी भारताबाहेरून आपला सहभाग नोंदवला आहे.

विजू माने यांची संकल्पना व दिग्दर्शन लाभले आहे. तर गायन आणि संगीत अनुराग गोडबोले यांचे आहे. या गाण्याचे गायन अभिजित कोसंबी, तामयी भिडे, रुपाली मोघे आणी चिन्मय हल्याळकर यांनी गायले आहे. संकलन सतीश पाटील यांचे असून निर्मिती व्यवस्था श्रीनिवास यांची आहे.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या