Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकएका मिस्डकॉलवर आता फास्टॅगचा बॅलेन्स कळणार

एका मिस्डकॉलवर आता फास्टॅगचा बॅलेन्स कळणार

दिल्ली : फास्टॅग वापरणाऱ्यांना आता आता एका मिस्डकॉलवर आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे याची माहिती मिळणार आहे. नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने फास्टॅग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या फास्टॅग ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर नोंदणी केला आहे.

त्यांच्या मोबाईल नंबरवर 91-8884333331 या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यास त्यांना एनएचएआयच्या प्रीपेड वॉलेटमधील शिल्लक रक्कमेची माहिती मिळणार आहे. हा नंबर चोवीस तास कार्यरत राहणार असून सर्व मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती एनएचएआयकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्व मोबाइल ऑपरेटरसाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.विशेष म्हणजे यासाठी इंटरनेटचीसुद्धा आवश्यकता नाही. हा क्रमांक चोवीस तास सुरु राहणार आहे. जर NHAI प्रीपेड वॉलेटला एकाहून अधिक वाहने जोडली असतील तरी वाहनांवरील सर्वच फास्टॅगचा बॅलन्स मिस्ड्कॉल दिल्यानंतर समजणार आहे.

जर एखाद्या वाहनाचा फास्टॅग बॅलन्स कमी असेल तर रजिस्टर्ड मोबाइलवर त्याला मेसेजद्वारे कळवले जाणार आहे. ही सुविधा नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाशी जोडलेल्या फास्टॅग ग्राहकाला ही सुविधा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या