Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

ठाकरे सरकारला धक्का; अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

Share
ठाकरे सरकारला धक्का; अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा Latest News Mumbai Minister Abdul Sattar Resigns for State Ministery

मुंबई : कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे सेनेच्या गोटात व महाविकासआघाडीला जोरदार धक्का बसला आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.

शिवसेनेतील महत्वाचे नेते म्हणून सत्तार यांची ओळख आहे. दरम्यान सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!