Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्यात २४ तासांत ५५३ नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांची संख्या ५२२९ वर

Share

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज नव्याने ५५३ कोरोना बाधितांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पाच हजार दोनशे २९ वर पोहचला आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे. यानुसार मागील २४ तासात राज्यात ५५३ नवे कोरोनाबाधित वाढल्याची माहिती समोर आली आहे. तर दिवसभरात १९ कोरोनाबाधितांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एकूण कोरोना बळींचा आकडा २५१ पर्यंत पोहचला आहे.

दरम्यान राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई शहरामध्ये आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसगणिक वाढत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील मुंबईमध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता केंद्रानेही एक विशेष पथक मुंबईत पाठवले आहे. याच्याद्वारा वरळी, धारावी सारख्या हॉट्स्पॉटची माहिती घेतली जाणार आहे. तर धारावीतील कोरोनाबाधितांना आटोक्यात ठेवण्यासाठी HCQ औषधाचाही वापर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धारावीत 150 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर पुणे, पिंपरी चिंचवडसह सारा पुणे जिल्हा सील करण्यात आला आहे. येथे संचारबंदी कडक करत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी केवळ दोन तासांची परवानगी देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!