Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वनडे सामन्यात हॅट्रिकसह घेतल्या दहा विकेट; ‘या’ भारतीय महिला खेळाडूचा विक्रम

Share
वनडे सामन्यात हॅट्रिकसह घेतल्या दहा विकेट; 'या' भारतीय महिला खेळाडूचा विक्रम Latest News Mumbai Keshvi Gautam Took 10 Wickets With Hat-trick in ODI

मुंबई : आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघाचा दबदबा असताना १९ वर्षाखालील एक महिला क्रिकेटपटूने भन्नाट कामगिरी करीत विक्रम रचला आहे. केशव गौतम असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे.

१९ वर्षंखालील महिला संघाची ट्रॉफी टूर्नामेंट दरम्यान हा विक्रम केला आहे. केशवी गौतम हिने अरुणाचल विरुद्ध खेळताना दहा विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एका हॅट्रिकचा ही समावेश आहे. केशवि हिने ४.५ षटकांत १२ धावा देत दहा विकेट चटकावल्या आहेत. यासोबत एक निर्धाव षटकही तिने टाकले आहे.

चंदिगढ आणि अरुणाचल प्रदेश या दोन संघामध्ये हा सामना होता. यावेळी चंदिगढ संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चंदिगढ संघाने ५० षटकांत चार विकेटच्या जोरावर १८६ धावा जमवल्या. यानंतर आलेल्या अरुणाचल प्रदेशचे फलंदाज एकही टिकाव धरू शकला नाही. केशव गौतम हिने केलेल्या भेदक गोलंदाजीने अरुणाचल प्रदेशाचा संघ अवघ्या २५ धावांत गारद झाला. यापैकी आठ खेळाडू एकही धाव घेऊ शकले नाही.

केशवी गौतम हिने फलंदाजीतही ६८ चेंडूत ४९ धावा संघासाठी दिल्या. त्यांनतर सुमार गोलंदाजीने संघाला विजयही मिळवूंन दिला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!