२० वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवत भारतीय संघ विजयी

0

मुंबई : फुटबॉल म्हटलं कि, अर्जेटिना या देशाचं नाव घेतले जात. परंतु भारताच्या २० वर्षाखालील फुटबॉल संघाने बलाढ्य अर्जेंटिना संघाला हरवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या संघाच्या २-१च्या फरकाने पराभव केला. भारतीय फुटबॉल संघाच्या औपचारिक ट्विट हॅण्डलवरून आज पहाटे साडेचार वाजता यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

२० वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहा वेळा विश्वविजेता राहिलेल्या अर्जेंटिना संघाला भारतीय संघाने स्पेनमधील COITF स्पर्धेमधील समान्यात धूळ चारली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या उत्तरार्धात ६८व्या मिनिटाला अन्वर अलीने भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड २-०ने आघाडीवर नेला.

त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ दबावामध्ये खेळताना दिसला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांनंतर अर्जेंटिनाने आपला सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल नोंदवला. भारतीय संघ या सामन्यात पहिल्या पासूनच आक्रामक पवित्रा घेताना दिसला. त्यातच पहिल्या चार मिनिटांमध्येच गोल नोंदवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. मधल्या फळीतील भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या.

LEAVE A REPLY

*