‘एमपीएससी’कडून परीक्षांची घोषणा; 200 जागा भरणार

‘एमपीएससी’कडून परीक्षांची घोषणा;  200 जागा भरणार

नाशिक । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) अखेर परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 15 पदांवर एकूण 200 जागांवर या परीक्षेद्वारे भरती केली जाणार आहे.

यातील सर्वाधिक नायब तहसीलदाराची पदे आहेत. यासाठी एप्रिल महिन्यात पूर्व, तर ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे.‘एमपीएससी’ने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार राज्य सरकारमधील 15 पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. गट ‘अ’ आणि गट ‘ब’च्या 200 जागांसाठी ही भरती होईल. यामध्ये सर्वाधिक नायब तहसीलदार या 73 जागांची भरती केली जाणार आहे.

सहायक राज्यकर आयुक्त 10 पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी 7, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी 1, उद्योग उपसंचालक, तांत्रिक 1, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता 2 अशी वर्ग एकमधील 21 पदांची भरती केली जाईल.वर्ग ‘ब’मधील उपशिक्षणअधिकारी, शिक्षण सेवा 25, कक्ष अधिकारी 25, सहायक गट विकास अधिकारी 12, सहायक निबंधक सहकारी संस्था 19, उपअधीक्षक भूमी अभिलेख 6, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग 1, सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी तत्सम 11 पदांची भरती केली जाईल.

या पदांसाठीची पूर्व परीक्षा पाच एप्रिलला राज्यातील 37 केंद्रावर घेण्यात येईल. यासाठी 23 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 2, 3 व 4 ऑगस्ट 2020 रोजी होईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com