Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Video : डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार पाहिलात का? मग हा व्हिडीओ बघाच

Share
Video : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'बाहुबली' अवतार पाहिलात का? मग हा व्हिडीओ बघाच Latest News Mumbai Donald Trum Bahubali Video Goes Viral On Social media

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा बाहुबली अवतार व्हायरल होत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये ट्रम्प बाहुबलीच्या भूमिकेत असून हा व्हिडीओ स्वतः त्यांनी रिट्विट करत शेअर केला आहे.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला भारतीय दौर्‍यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या या भारत भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना सदर व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी व्हिडीओ रिट्विट केल्याने तो अधिक व्हायरल झाला. यावर लाखो लोकांनी लाईक, कमेंट आणि रिट्विट केले आहे.

या व्हिडिओमध्ये भारत आणि अमेरिकेची अ‍ॅनिमेटेड पात्रांशी मैत्री दर्शविली गेली आहे. बाहुबली चित्रपटाचे एक फुटेज संपादित करण्यात आले असून ट्रम्प बाहुबली असल्याचे दर्शविले गेले आहे. त्याचबरोबर त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्पसुद्धा त्याच्याबरोबर रथावर बसताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत. संपूर्ण मीम व्हिडीओमध्ये बाहुबलीचे लोकप्रिय गाणेही समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!