जीवनावश्यक वस्तुंची दुकानं बंद राहणार नाहीत, नागरिकांनी गर्दी टाळावी : उद्धव ठाकरे

मुंबई : देशात आणि राज्यात लॉकडाऊन असले तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने कोणत्याही स्थितीत बंद राहणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्या दुकांनावर गर्दी करु नये, तसेच आज गुढीपाढव्याचा दिवस आहे. या शुभ दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण संयम राखून आणि एकत्र न येता घरी बसून कोरोना व्हायरस संकटाचा लढा यशस्वी जिंकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.

गुढी पाडवा आणि कोरोना व्हायरस संकटामुळे देश, राज्यात असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यंनी या आधी दोन वेळा जनतेला संबोधित केले होते. ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जनतेले उद्देशुन केलेले हे तिसरे भाषण होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला विश्वासात घेऊन विश्वास दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काल लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज दुपारी मी आपल्याला भेटायला येत आहे. मी मुद्दामच दुपारी आपणास भेटायला आलो आहे. कारण, रात्री लॉकडाऊनचा निर्णय झाल्यावर सकाळी सकाळी मी आलो असतो तर आपल्या छातीत उगीच धस्स झालं असतं. आज मी काहीही नकारात्मक बोलायला आलो नाही. तर, सकारात्मक विचार मांडायाला आलो आहे.

हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. लढवय्या महाराष्ट्र आहे. हे आपण कोरोना व्हायरस विरोधात लढा देऊन दाखवून देऊया, असे स्मरणही उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले आहे.