Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

Budget2020 : अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Share
जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रीया, Latest News Budget Distric Political Leder Feedback

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अखेर अर्थसंकल्प २०२०-२१ सादर करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्प झाल्यानंतर देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यावर संमिश्र मत मांडले आहे.

दरम्यान भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता. सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाली असून विरोधकांकडून यंदाच्या बजेटवर टीका करण्यात आली आहे. या बजेटवर काँग्रेस नेते राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, छगन भुजबळ, संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी या अर्थसंकल्पाची वाहवा केली आहे.

या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, निर्मला सीतारमण यांनी अडीच तासांच्या वर त्यांनी संसदेत भाषण केल आहे. हे बजेट निराशाजनक असून त्यांनी अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद केलेली नाही. मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा आहे. तसेच मोदी सरकारने कररचनेला अधिक क्लिष्ट केले असल्याची खंत व्यक्त केली आहे. तर बाळासाहेब थोरात म्हणाले की, सदर अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठे आहे? सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा मोदी सरकारने केली आहे. तर अरविंद केजरीवाल म्हणाले कि अर्थसंकल्पातून दिल्लीला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु दिल्ली भाजपच्या अग्रक्रमात येत नसल्याचे अर्थसंकल्पातून दिसून आले.

तर बजेट सादर करतांना निर्मला सीतारमण यांनी सर्वात प्रथम लोकसभा निवडणूक २०१९ च्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त कले. तसेच लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला बहुमत मिळाले होते. देशाच्या जनतेचा मोदी सरकारवर भरोसा असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. हे बजेट देशाच्या महत्वकांक्षा पूर्ण करणारे बजेट ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!