Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मध्यप्रदेश मध्ये पुन्हा भाजप सरकार; शिवराजसिंग चौहान घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Share
मध्यप्रदेश मध्ये पुन्हा भाजप सरकार; शिवराजसिंग चौहान घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ Latest News Mumbai BJP Government Again in Madhya Pradesh

नवी दिल्ली : मध्य प्रदेश मध्ये ९ मार्च पासून सुरु असणाऱ्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेरीस आज पडदा पडणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानांतर आज संख्याबळ सिद्ध करून भाजपचे शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये चौहान यांची चौथ्यांदा मुख्यमंत्री म्ह्णून नेमणूक होणार आहे.

दरम्यान हा शपथविधीचा कार्यक्रम भोपाळ येथील राजभवनात राज्यपाल लालजी टंडन यांच्या समक्ष रात्री ९ वाजता शिवराज सिंह चौहान शपथ घेतील अशी माहिती आहे. आज काही वेळापूर्वी भाजपच्या नेते मंडळींची मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर आधारित बैठक पार पडली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच अन्य २२ आमदारांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यामुळे एका पाठोपाठ एक कमलनाथ सरकारचा पाया कोसळत चालला होता, आपल्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना 20 मार्च रोजी विश्वासदर्शी ठरावाला सामोरे जायचे होते, मात्र बहुमत चाचणीच्या अगोदरच कमलनाथ यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!